ही कुंद कुंद सकाळ ,
हा मंद मंद वारा
का लपून बसतोस रे,
करून असा इशारा..?
पुरे झाले आता,
ढगाआडून त्या..धरणीला पहाणे
तिचे प्रेम पाहण्यासाठीच ना..सारे तुझे बहाणे..?
तुझ्याचसाठी झुरते, तिला तू खुलवायचे
शिवारातल्या स्वप्नांना तूच रे फुलवायचे
भेटीची आस तुलाही, मग उशीर का व्हावा..?
बरस बरस आता असा..कि आसमंत नहावा,
अन मरणाआधीच मी ,
स्वर्ग इथे पहावा...!
-अमिता
(पाऊस..दरवर्षी येतो..पण येताना दरवेळी नावीन्य घेऊन येतो. त्याची वेगवेळी रूपं आहेत, वेगवेगळे पैलू..आपण पाहू तसा तो आपल्याला भेटत जातो..म्हणूनच पावसावर एवढं लिखाण आजवर होऊनही हा विषय अगदी फ्रेश..आहे आणि राहील. सुचेल तसं यावर लिहायचा विचार आहे..या आणि इतर लिखाणातही अमुक गोष्ट आवडली, ही नाही आवडली, खटकली अशा सर्व प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. ur comments are important for me..so stay tuned! )

Apratim! Dhaga aadhun dhartila pahnara, ani barsalya nantar swargiy chaitanya ubha karnara Pavus kharach Chirtarun ahe... Ani tyavar kitihi lihil tari ha Vishay freshch ahe! Tyat tuzya dokyatala pavus Asach barasu det... Keep raining Amita!
ReplyDeleteThank u so much!
DeleteSundar
ReplyDeleteThanks yogita..
DeleteSahi ch "सुरेख"
ReplyDeleteThanks a lot!
DeleteApratim
DeleteApratim
DeleteThanks Rashmi ma'm!
DeleteSundar :)
ReplyDelete