Friday, 30 November 2018


जिंदगी की कसम..
जिंदगी से तकरार नहीं
जिक्र फूलों का है,
पर ये मौसम-ए-बहार नहीं..

रुखी हवा में भी दिल..होता है ना नम ?
घिर आती है बदरिया..बेवजह..बेमौसम..
बाहर का शोर दुनिया सुने..
पर अंदर का शोर ? एक खुदा..एक हम...! 

संभलके चलो- हवा को कहना..
आसान है क्या ..दायरों में बहना..?
वक्त ने कहा- "थोडा इंतजार फर्माना.."
हमने भी हसके सुनाया-
"तोहफा हो नायाब..,तो कुबूल है जुर्माना...!"
#यूँही...
                                                 - ©️अमिता 
                                                  copyright 2018 -19 All rights are reserved 
                                                  PC- Namrata Patil
Note:
१.मौसम-ए-बहार- वसंत ऋतू 
२. बदरिया- मेघ/clouds
३.दायरों में- मर्यादा में/in specific radius
४.तोहफा- gift , नायाब- बढिया और जो जल्दी न मिले
५.जुर्माना- दंड(हिंदी- कीमत)/fine 

Tuesday, 23 October 2018


अधुरा चांदवा दिसतो आज पुरा पुरा 
खुलवतो आतुर निशेला 
उधळून हा चांदणचुरा..
चांदव्याची शीतलता पुनवेला घ्यावी तनात,
कोजागिरी असावी इथल्या मनामनांत..
#यूँही..
                                                                  -अमिता
#कोजागिरी_पौर्णिमा_२०१८ 
                                                 

Sunday, 21 October 2018


दिया है यकीन का यारो,
और उसमें लगी आरजू की तार है 
बिजली के होते हुए,
अंधेरे की बात..बेकार है...
पुछिए हर तार से जी..
जलना तो बस बहाना है,
इस रोशनी से रोशन 
किसी का आशियाना है...
हररोज कोई दिल यहाँ..
खोलता ख्वाबों की किताब है,
मामुली चिराग ही सही,
जलाओ अगर विश्वास से ..
तो - 'आफताब' है...!

#यूँही.._चिराग 
(आफताब = सूरज/sun)
                                         - अमिता
Picture Credit - this creative bulb is clicked by me @ - Hotel Orion ,पुणे 
हा कल्पक विजेचा दिवा (बल्ब)मला Hotel Orion ,पुणे येथे दिसला(Thanks to the place!)

Sunday, 30 September 2018


मातीला सोडण्याची आस नाही 
ना उडून जाण्याचा ध्यास आहे 
झुलण्यास पुरे मला, 
वाऱ्यावरचा विश्वास आहे..
काट्यांत राहुनी.. गुलाब अमुचा राजा 
सर्वांसाठी गंधाळतो 
धुंद मोगरा माझा...
खुलवेन माझ्या परीने 
बाग मीही सानुली..
फ़ुलणेच कशी विसरेल 
स्वच्छंद ही सदाफुली...?

#यूँही..
#बात_फुलों_की...
PC- Namrata Patil thanks!

                                                                   -©️अमिता

Wednesday, 22 August 2018


सरलता चीखती है कभी कभी
मेरी सुनो, मेरी सुनो..
पर दुनिया कहती है-
पगले, हरिश्चंद्र ना बनो!
फिर भी सच्चाई छूटती नही खुदा,
ईमानदारी तो जैसे कोई लत है..
फूलों को क्या पता,
उन्हे कुचलना ही शायद..
इस जमाने की फितरत है...
#यूँही..
#DarkSideOfThe_World
                                           - अमिता

Monday, 13 August 2018


बोडखे डोंगर कुणी केले बरवे ?
कुणी अंथरले त्यांवर, गालिचे हिरवे..?
निळ्या अंगणात रोज,
सावळ्या नभुटल्यांचा पिंगा..
कैलासातून महेश्वर धाडतो का गंगा ?
थेंब प्याली..झाली नवेली..
झाडे जणू लपवती वय,
साजिऱ्या श्रावणसरींना नाही 
गोजिऱ्या उन्हाचं भय...!

#यूँही... 
#श्रावण_ऊनपावसाचा_खेळ 
(आकाशात गर्दी करणाऱ्या प्रत्येक सावळ्या ढगासाठी (नभासाठी ) 'नभुटली ' असा शब्दप्रयोग केला आहे :) उदा. निशू- निशुटली  
-©️अमिता
copyright 2018 -19 All rights are reserved

Tuesday, 7 August 2018

रुसव्या नभास...


दाटलेल्या नभाचे 
चिंतातूर मन भोळे 
का कळेना भरून आले 
ते गहिरे गहिरे डोळे...

अवघड झाले थोपवणे 
अश्रूंना दाटलेल्या 
बागेतल्या या कळ्या म्हणे,
"अजून का मिटलेल्या ?"

नदीची खळखळ, झऱ्याची सळसळ 
अन पाचूच्या रानात पहा,
सोनपाखरांचा मेळ...
विसरलास का तू,
कळ्यांची फुले व्हायला 
लागतो रे थोडा वेळ ...

"मी बरसवतो गं वेड्या सरी
पण जग किती हे फसवे ?"
एकदा बघ तरी..
मोत्यांपरी कुणीतरी 
जपलीत तुझी आसवे...

का म्हणतोस कुणासाठी वाहायचे ..
तू नसता हे मोती 
कुणी कसे पाहायचे ?
थांबला तो संपला ..हे सृष्टीचे मर्म 
सदैव वाहत राहणे 
हाच तुझा धर्म ..

क्षण हाच..ज्यासाठी..
काळही होता तरसला,
आज..कित्तीतरी दिवसांनी तो 
पुन्हा आनंदाने बरसला...
पुन्हा आनंदाने बरसला...!!

#यूँही...
- ©️अमिता 
#PC- ब्रम्हकमळाच्या पानावर साठलेल्या थेंबांचा हा सुंदर क्षण टिपलाय माझी ताई - 'नम्रता पाटील 'हिने.Thanks ताई !

Saturday, 16 June 2018

एक झाड...


एक झाड..उभं वादळात,
तग धरून असतं..
सोसून ऋतू सारे, अविरत खपत असतं ,
गाजावाजा न करताच 
फुला-फळांना जिवापाड जपत असतं 
घट्ट रोवतं पाय किती 
तरी -"मातीच सांभाळते मला",
सर्वांना सांगत असतं ,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...

सळसळ ऐकून पानांची 
मनोमन सुखावतं,
भयाण वारा सुटल्यावर 
काळजीनं दुखावतं
खोडा-मुळांना भक्कम ठेवून 
डोलारा सांभाळतं,
फांद्यांच्या उनाडपणाला लगोलग आवरतं
कधी अस्वस्थ असलं तरी ,
खूप खूप खंबीर दिसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...

एके दिवशी फुला-फळांचंही झाड होतं
कधीतरी जे फक्त - बाळ होतं ,
'बाप' नावाच्या झाडाचं मन,
फुलून मग 'आभाळ' होतं..
उरल्या-सुरल्या पानांनिशीही 
बहरलेलं ते दिसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...

आजवर आपण दिली 
तशी आपल्यालाही मिळेल का सावली ?
आपल्याला मिळो न मिळो,
कुणालातरी मिळेलच ! 
या विचाराने समाधानाने हसतं,
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...
एक झाड..उभं वादळात,,
तग धरून असतं...

#सर्व_'बाप'माणसांना_समर्पित!!
#यूँही...Father'sDay2018

                                    - ©️अमिता अशोक पाटील 
                                       copyright 2018 All rights are reserved

Wednesday, 6 June 2018


तू निघालायेस म्हणे...,
कितीदा सांगते, हळूच ये ना..
पण वाजत-गाजत येण्याचा 
छंद तुझा जुना...
वारा सांगतोय - संपली आता चातकाची विनवणी 
ये हां वेळेत..लिहूया अजून एक हिरवी कहाणी...
#यूँही...(@मॉन्सून)_धरती
                                     -©️अमिता   
(Note - *चातक- पावसाची वाट पाहणारा एक पक्षी. तो पावसाच्या पाण्यावरच जगतो असं म्हणतात.)
PC- The Hindu(AUGUST 26, 2017) -Awesome Click by- K. Murali Kumar- (thanks :) )

Sunday, 13 May 2018


मुस्कान जो झलकती है 
तुमसेही मिली है 
उलझनोंके बावजूद जिंदगी  
तुमसेही खिली है..
आता है गुस्सा जब-जब डाँट तुमसे पडती है  
पर जानती हो तुम भी..ये गाडी ऐसेही आगे बढती है
दामन तेरा है- दुवाओंका आस्माँ..
ख़ुशियोंके सागर को,कतरा तो दे सकू,
यही चाहत है माँ...
                                     -©️अमिता   
#यूँही...(MothersDay_2018)_DedicatedTo_Mothers_inTheWorld
(*कतरा- drop/tukda)
(PC- google)


     

Sunday, 29 April 2018


अजून ओढ लावते माती अन 
अजून 'भोवरा' जिवाचा..नात्यांच्या तळ्यात होतो,
थकले हात फिरता गालावर
भर उन्हात..पाऊस डोळ्यात येतो...
अजून ताजी आठवाची फुले, सांगती माझे मूळ..
ओळखीचा हा वारा,
अन ओळखीचीच ही - 'इमानी' रानधूळ...
#यूँही...
#आठवणीतली_उन्हाळ्याची_सुट्टी_गाव...
                                                      - अमिता 
                                                        copyright ©️2018

Thursday, 8 March 2018

बस...इतनी-सी बात है...

वो बोला :
कहो तो थोडा हाथ बटा दू?
आखिर तुम्हारे भी तो दो ही हाथ है 
आज बहोत आगे हो..खुश हो ना ?
कहो..अगर कोई बात है...

वो बोली :   

सूनते रहते हो ना तुम ..
"बेटा, वक्त पर खाना खा लेना" ,"भैय्या, जल्दी घर आ जाना"
"अजी..संभलकर ड्राइव्ह करना", "'पापा,दवाई समय से लेना"  
हा..शक्ती हूँ मै..पर अपनोंका खयाल भी रखती हूँ
डरती हू मगर..तुम्हारे डर को भी पहचान सकती  हूँ,
बस..इतनी-सी बात है..

आजादी के आकाश में उडती हूँ

पर मर्यादा और लिहाज की सीमाए भी जानती हूँ 
पूजा नहीं चाहती लेकिन 
मेरे पीठ-पीछे मेरे हुनर और जिगर के बजाय 
मेरी फिगर की बात न हो..बस..इतनी-सी बात है..
चुल्हा-चौका, झाडू-पोछा , कागज-कलम 
दफ्तर-वफ्तर,बच्चों की पढ़ाई..
गप्पे-शप्पे, रंगोली,सिलाई या कढाई..
जो भी करू दिमाग के साथ दिल भी लगाती हूँ,
बस..इतनी-सी बात है..
थक जाती हूँ कभी कभी 
मगर तुम यूँ ..कदर करते हो न 
तब बहुत खुश होती हूँ,
बस..इतनी-सी बात है.. 


बेशक खूश हूँ मैं
आखिर औरत-मर्द जंग थोडेही है ? 
जीवन अगर महफिल है , 
तो उसे हरदम सुरीली बनाये रखना
ये मेरी जज़्बात है.. 
न तुम्हारे आगे, न तुम्हारे पीछे 
बस..साथ चलने की बात है..
सच कहती हूँ..बस..इतनी-सी बात है..
#यूँही...
#From_Woman's_Heart...
#Respect_Everyone_Irrespective_of_Gender
                                                                                                                                         -अमिता 

Sunday, 18 February 2018



थिजून जातो  दरबार ऐकताच
"सिवाजी..जिंदा या मुर्दा..कौन ला रहा है?"
निर्वतल्यावर शत्रूही म्हणतो..
"या खुदा..तेरा नेक बंदा आ रहा है.. !"
छाटून बोटे अन्यायाची, स्वराज्य केले खडे
बेड्या सोडवण्याची ताकद दिलीस,
तेव्हा मराठी पाऊल पडते पुढे...
दौलतखान, इब्राहिमखान, जिवा महाला,
बाजीप्रभू अन तानाजी..किती करावी गिनती
माणसे कमावली ज्याने जाती-धर्माच्या तोडून भिंती..
धन्य झाल्या जिजाऊ अन धन्य झाली महाराष्ट्राची माती,
"अशीच आमुची आई असती सुंदर, तर आम्हीही झालो असतो सुंदर"
वदले जेव्हा शिवछत्रपती...!
नावाने ज्याच्या चैतन्याचा झरा सळसळतो
गड आला तरी सिंहासाठी..राजा आपुला हळहळतो..
वाघाच्या या काळजाने..माउलीसम जपली प्रजा..
कणखर सह्याद्रीही लवून म्हणतो..
जय जय शिवाजीराजा...!
जय जय शिवाजीराजा...!!!
                                                                                                 -अमिता

                                                                                                 sketch by- नम्रता पाटील (Thank u!)
पराक्रमी माणूस संवेदनशील असला आणि राजा असा असला तर काय होऊ  शकतं याचे मूर्तिमंत आदर्श  उदाहरण म्हणजे -महाराष्ट्रच्या अन भारताच्या शिरपेचात दैवाने खोचलेला मानाचा तुरा , किंबहुना तो शिरपेचच -जिजाऊंचे, मावळ्यांचे शिवबा , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते -छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..विनम्र अभिवादन!
 

Tuesday, 13 February 2018

साथ...


  



   मूळ रांगोळीत नसलेले जास्तीचे ठिपके मांडून तिनं रांगोळी पूर्ण केली. "किती  ते किती  ठिपक्यांची आहे हो ही रांगोळी ?" हा तिला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न..समोरच्याला सहजासहजी ठिपक्यांच्या गणिताचा अंदाज येऊ नये इतकी सुरेख अन परफेक्ट रेखाटलेली रांगोळी..कधीकधी ती अजून सुरेख करण्यासाठी लागणारे ठिपके वाढवून ती पूर्ण केलेली..संसाराचंही असंच असतं.., नाही ? जगाला अंदाज लागू देता सगळे ठिपके काळजीपूर्वक जोडत जोडत रेखत जायचे असतात..कधीकधी तडजोडीचे (adjustment चे) ज्यादा ठिपके देऊन ती सुरेख करत जायची  असते. जमतं सगळं..फक्त रेखाटणाऱ्या दोन बोटांची साथ घट्ट असली पाहिजे..त्यांची आठवण येऊन ती स्वतःशीच हसली..

       तीस वर्षांचा संसार..असाच तर करत आलो आजवर..नोकरी करणारा जावई मिळाला म्हणून आईवडिलांनी आनंदानं पाठवणी केली होती..खेड्यातून शहरात..जेमतेम मॅट्रिकच्या शिक्षणाने दिलेला आत्मविश्वास घेऊन, एकेक गोष्ट शिकत, पतीच्या मोजक्या पगारात काटकसरीनं सगळं केलं. शहरात आलेला मध्यमवर्गीय माणूस गावापासून दूर असला तरी घरच्यांसाठी खूप काही करत असतो..त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षांमध्येही फार हौसमौज, चैन करता आली नाही. पण तरीही सुंदर होते ते दिवस..अगदी कधीतरीच सोबत पाहिलेला सिनेमा, कधी घरीच दोघांनी किंवा त्याकाळी अक्ख्या कॉलनीसोबत पाहिलेल्या टीव्ही.मालिका, बोलताही खूप काही बोलून जाणारा- दोघांनाही भिजवणारा- एकच पाऊस, काडी-काडी जोडून घरटं बांधावं तशी एकेक वस्तू जोडून थाटलेलं छोटं घर.नंतर सगळी स्वप्न मुलांच्याच डोळ्यात पाहिली. आता नातवाला खेळवताना मुलांच्या  लहानपणीच्या  आठवणींत रमून जातो दोघेही.लग्नानंतर सुरुवातीला वाटणारं शारीरिक आकर्षण, नंतर मुलं-बाळं..फक्त एवढंच नसतं ना आयुष्यात जोडीदाराचं महत्व..?भावनिक गरजाही महत्वाच्या अन दीर्घकालीन असतात. आपल्याला समजून घेणारा जोडीदार , आपली सुख-दुःखं, स्वप्नं आणि मनातलं सगळं ज्याच्यासोबत वाटून घेता येईल अशी साथ खरंच हा प्रवास समाधानी बनवतात .प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदारात असा पार्टनर..असा मित्र/मैत्रीण  शोधत असते.

      आयुष्य आणि अडचणी यांचं जवळचं नातं आहे, किंबहुना या समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वीची गोष्ट..माहेरी मदतीसाठी स्वतःचा दागिना देताना खरंतर खूप घाबरून, संकोचून गेले होते मी.पण यांनी एका शब्दानेही विचारता संमती दिली होती. एकवेळ मी दादाकडे तो परत मिळवण्यासाठी तगादा लावला असेल पण ही गोष्ट अगदी भांडणातही बोलले नाहीत चुकूनही..आई-बाबा (सासू-सासरे) होते तोवर त्यांनाही आवडायचा आणि यांनाही  आवडतो माझ्या हातचा स्वयंपाक. पण त्यातही हे नको, ते नको..असं करता केलेलं सगळं आवडीनं खातात. कधीकधी माझ्या सूचनांनी वैतागले तरी त्या पाळतातही. मतभेद होतच नाही असं नाही..पण लोणच्यासारखं मुरलेलं नातं त्यातूनही मार्ग काढतंच.समोर काही बोलणार नाहीत पण कधीतरी धाकटा लेक सांगत होता- "पप्पा कुणालातरी सांगत होते..आमची 'ही' आणि मुलं यांनी फार काही  मागितलंच नाही माझ्याकडून..समजूतदार आपली माणसं मिळणं हेही भाग्यच!" आता मुलं म्हणतात- दोघांनी हि इंनिंगही  उत्साहानं जगा..राहिलेल्या, मिस केलेल्या गोष्टी, जागा पहा. तेव्हा खरंच भरून पावल्यासारखं वाटतं.

   घरात येऊन तिनं चालू असलेला पंखा बंद केला. गरज नसताना पंखे,दिवे बंद करण्याच्या वीजबचतीच्या त्यांच्या सूचना ते घरी नसताना जास्त लक्षात येतात. एरवी त्यांचंच जास्त लक्ष असतं त्याकडे.आज आपण समाजात पाहतो की पत्त्यांचं घर कोसळावं तसं प्रेमानं उभे केलेले काही संसार आकर्षणाची चमक संपल्यावर कोलमडतात..तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ समजण्यात आपण कमी पडतोय का ? असं वाटतं. प्रेमाच्या आणाभाका खूप उत्साहानं घेणं सहज शक्य आहे..पण ते निभावताना लागणारा विश्वास, आदर आणि व्यक्त करताही नंदादीपासारखं अखंड तेवत असणारं प्रेम ..हे आपल्या आईबाबांच्या पिढीतल्या बऱ्याच जोडप्यांकडे पाहिलं की लक्षात येतं. आणि ते शिकण्यासारखं आहे . अर्थात प्रेम व्यक्त करणंही महत्वाचं आहे आणि जरूर करावं पण त्या व्यक्तीला त्याचे गुणदोष, त्याची माणसं या सर्वांसोबत स्वीकारून एकमेकांची साथ निभावण्याची ही प्रेमाची भाषा नितांत सुंदर आणि आवश्यक आहे असं वाटतं.

       दरवाजाची बेल वाजताच तिनं दरवाजा उघडला. बऱ्याच दिवसांनी समोर त्यांना पाहून तिचा चेहरा उजळला. "आज पिठलं-भाकरीचा बेत कर..तोंडाची चव बिघडलीय" फर्माईश आली. "आणि.. हे धर" गुलाबाचं फूल हाती सोपवत ते म्हणाले. "हे काय नवीन ?"  "अगं, खूप आलेत बाजारात..valentine day  की काय आहे म्हणे..छान वाटला म्हणून घेतला गुलाब..तुला आवडतो ना..?"

"हम्म..छान आहे..फुलदाणीत ठेवते" म्हणून ती पिठलं-भाकरीच्या तयारीला लागली.

#आयुष्याच्या_चढ_उतारांमध्ये_वर्षानुवर्षे_सदैव_एकमेकांना_साथ_देणाऱ्या_सर्व_सदाबहार_जोडप्यांना_समर्पित!!!
#DedicatedTo_All_EvergreenCouples_who_Have_been_StandingWith_EachOther_Since_Years&Years_throughout_Ups&Downs_Of_Life!!!

                                                                            (संकल्पना- विशाल पाटील )
                                                                            विस्तार व शब्दांकन- अमिता अशोक पाटील.