विश्वास से ढक्कन खुला क्या रह गया,
कपूर-सी उडने लग गयी खुशिया...
पर मुश्किलोंके पत्थर..खडे थे ऐसे
जैसे..बिना इनके मुकम्मल ना जिंदगी हो,
सोच लिया तबसेही..
ऐसे जीयेंगे जिंदगी..जैसे खुदा की बंदगी हो...!
#यूँही...
- -©️अमिता
Note-
१. कपूर- कापूर
२.मुकम्मल - पूर्ण/पूरी/complete
3.बंदगी- आराधना (generally ईश्वराची)
आता तुझे येणे व्हावे...
अंदाज ऐकते रोज नवे मी,
तुझे खुलासा देणे व्हावे..
पुरे झाली तल्खली जीवाची,
आता तुझे येणे व्हावे..
उष्म्याने बघ विक्रम केले,
माणसाने आता शहाणे व्हावे
रुसणे मंजूर सख्या रे..
परि एकदा तुझे दिसणे व्हावे...
नको धाडू ,वाऱ्याच्या हाती पैंजणे,
घना..तुझ्यात केवळ भिजणे व्हावे
सोसली ना पानगळ ही,
आता नव्याने रुजणे व्हावे...
कोरडयाठाक विराणीचे
चिंब..ओले गाणे व्हावे
पुरे झाली तल्खली जीवाची,
आता तुझे येणे व्हावे..
आता तुझे येणे व्हावे...!!
-©️अमिता
#यूँही...
#धरती_पाऊस...
Note-
1. तल्खली- काहिली(उन्हामुळे होणारी तगमग)
2. विराणी- विरहगीत/कविता
कधीच ४० चा आकडा पार न केलेल्या पुण्यात यावर्षी तापमानाचा पारा ४० पर्यंत पोचला.मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागांतही गेल्या वर्षाच्या तुलनेत तापमानात लक्षणीय वाढ झाली. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात ते ५१ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. नुकतंच 'स्वप्नील अधिकारी ' यांनी share केलेलं - 'विनाशाच्या उंबरठ्यावर' (लेखक - गिरीश राऊत) हे पुस्तक वाचनात आलं. जागतिक तापमानवाढीच्या भीषण वास्तवावर ते भाष्य करतं. निसर्गचक्रात आपण माणसांनी केलेल्या अतिरेकी हस्तक्षेपाची झळ जास्त बसू लागली आहे याची जाणीव झाली.
ध्रुवांवर वितळणारा बर्फ, उत्तराखंडमध्ये पाहिलेली नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, चक्रीवादळं , हिमालयात नैसर्गिकरित्या तयार होणारं बर्फाचं शिवलिंग वितळल्यामुळे तयार करावं लागणं, जेजुरीला कालच झालेल्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवाच्या स्नानासाठी वापरलं जाणारं कऱ्हेचं पाणी आटल्याने टँकरच्या पाण्याचा उपयोग करावा लागणं..या घटना काय दर्शवतात ? येत्या काही वर्षात पुढील पिढ्यांना पाऊस किंवा निसर्गाचं फक्त अनियमित ,विक्राळ, टोकाचं रूप (extreme) म्हणजे कधी दुष्काळ, कधी महापूर असं पाहायला मिळू नये..पहिला पाऊस , पावसाची निरनिराळी रूपं, सृष्टीचं सृजन त्यांना अनुभवायला मिळणार नसेल तर ती आपली चूक असेल. निसर्ग दयाळू असला तरी असह्य झाल्यास त्याचे हिशोब कालांतराने तो चुकते करतो .सध्याचे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी तीव्र आहेत..म्हणून वेळीच सावध होऊन पर्यावरण संवर्धनात आपला खारीचा वाटा उचलूया. आपल्या परीने आपण काही गोष्टी तूर्तास करू शकतो.
१. झाडे लावणं..आपल्या परिसरात, वैयक्तिक पातळीवर किंवा पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमात भाग घेऊन.
२. मोटारींचा, कमीत कमीत वापर करणं, शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडणं.
३. पाश्चात्य देशांचं अंधानुकरण न करता पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं इत्यादी.
बदलीच्या प्रत्येक ठिकाणी स्थलांतर करताना माझी आईने तिनं वाढवलेल्या झाडांच्या कुंड्या, जमिनीत लावलेल्या झाडांची रोपं, हे सगळं घेऊन जायचा हट्ट पूर्ण केला, आजही शेतात फुलवलेल्या पिकांविषयी बोलताना तिच्या मनात सारखंच समाधान असतं कारण आपण निसर्गाला जेवढं देतो त्यापेक्षा अमाप तो आपल्याला देतो. खरंच, सृजनाच्या प्रक्रियेचा भाग होणं, ते अनुभवणं यात आनंद आहे..त्याची अनुभूती घेत राहूया.
तुमच्यापैकी बरेच जण हे आधीपासूनच करत आले असाल..तुमची इच्छा असल्यास तुमचा उपक्रम सर्वांसोबत शेअर करू शकता..ज्यातून इतरांनाही प्रोत्साहन/कल्पना मिळेल.
#Hoping_For_Happy_Monsoon... :)