पुरे टिपटिप किती बरसशील
भास्करही आता निजला
गं..
हिरवा शालू या
धरेचा
आसवांनी तुझ्या भिजला गं..
उगवणाऱ्या प्रत्येकाला इथे प्राक्तन
अस्ताचं
बरसणं तेव्हाचं अन बरसणं
आताचं
आली होतीस- ढगांच्या गडगडाटात
विजेच्या कडकडाटात अन वाऱ्याच्या
साथीनं..
आता एकटीच..
जशी देवघरात उदबत्ती जळते
आहे
माहेरवाशीण
मुलगी जणू
चोरटे अश्रू ढाळते आहे..
कधी रिमझिम कधी झरझर
धो धो कधी
बरसलीस तू
कुठे नाचलीस, कुठे साचलीस
कधी दडून मग
पुन्हा फिरलीस तू
विहिरींच्या
गळ्यात,माझ्या मळ्यात
बहरल्या रानात, भिजल्या मनात
अन पानापानात उरलीस तू...
फुले फुलली, पिके डोलली
बळीराजाची कळी खुलली
दोन हातांनी उदंड देऊन
वर्षाराणी परत चालली..
रिते करुनी घट मेघांचे
जाशील तू..
पाहता पाहता दिसेनाशी होशील
तू..
निरोप घेतानाही लाडके, तू
हसत जा
वाट तुझी पाहत
असेल
प्रिय तुझा वरुणराजा..
ओढ तुझी लावील
सृष्टीला
घडी हीच निरोपाची
पुढल्या वर्षी कळव पुन्हा
खुशाली तुझ्या संसाराची…
- अमिता

