गेली पाच मिनिटं
संध्या स्वतःलाच आरशात न्याहाळत
उभी होती. खुलून
दिसणाऱ्या लाल रंगाच्या
साडीच्या निऱ्या तिनं व्यवस्थित
केल्या. कमरेपर्यंत रुळणारे मोकळे
सोनेरी केस हलक्या
हातांनी सावरत उगाच पापण्यांची
मंद उघडझापही करून
पाहिली.एरवी तिला
मांजरीसारखे वाटणारे घारे डोळे
आज काजळाने जरा
जास्तच उठून दिसत
होते.कानात डुलणाऱ्या
झुमक्यांकडे बघताना आज दिवसभर
ऑफिसात ऐकलेली वाक्य.."छान
दिसतेयंस हा !", "looking beautiful
!","डोळे सुंदर आहेत गं
तुझे!" ही वाक्ये
आठवून ती स्वतःशीच
छान हसली."चला
पार पडला एकदाचा
traditional day..! " दिवसभरातला
शेवटचा सेल्फी घेऊन तिनं
मेकअप उतरवायला सुरुवात
केली.
लिपस्टिक
पुसून टाकताना तिनं
स्वतःलाच विचारलं- "आजची मी
अन रोजची मी
फारच फरक आहे
का ?" मोकळ्या
केसांत जेवढी छान दिसते
तेवढी तेल लावून
घातलेल्या वेणीत...? काजळ, eyeliner, लिपस्टिक
यांच्याशी फार मैत्री
झालीच नाही कधी.
हळूहळू प्रसंगानुसार (occasionally )का होईना
वापरायला शिकले. पण पुस्तकं-कागद-पेन-माईक-प्रवास-गाणी यांच्यासोबतची
सहजता कदाचित इकडे
अजून नाहीच. तरी
कधीतरी नटायला आवडतं..कुणाला
आवडत नाही ?या
गोष्टींचा माझं काम,
कार्यक्षमता, आणि माझ्या
स्वभावाशी काही संबंध
नाही ना ?पण
कधीकधी तुम्ही चढवलेल्या पुटांवरून
तुमची लायकी ठरवणारी
माणसं पाहिली की
खटकतं ना ? निसर्गाकडे
असं नसतं..पाऊस
कसा खरा असतो..सगळी पुटं
धुवून काढतो अन
म्हणूनच असेल कदाचित
पण भिजल्यावर ती
नितळता आपल्याला अनुभवायला मिळते.
कोरलेल्या
दाट भुवयांकडे पाहताना
तिला काही दिवसांपूर्वीचा
प्रसंग आठवला.
"ए..
तू त्या फेशिअल
वाल्या क्लायंटकडे बघ..मी
आहे इकडे. आणि
ते वॅक्स गरम
करायला ठेव गं
रेश्मा .." 'ब्युटीफुल'
ब्युटी पार्लरची संचालिका सौ.
रुपाली आपल्या
सहकाऱ्यांना भराभर सूचना देत
होती. संध्या अन
तिची मैत्रीण शरयू
त्यांच्या नंबरच्या प्रतीक्षेत होत्या."हम्म ..तुझं काय
आहे..?" "आयब्रोज आणि हॅन्डवॅक्स.
" हेअरकट वगैरे ?" "नाही..सध्या तरी नको..मागच्या महिन्यात तर
दिला होता shape" "साधा
आकार ?स्टेप..लेअर
काहीच्च नाही ? काय गं
..कशी राहतेस..जरा
बघ आजूबाजूला..वेणीकडे
अगदीच कसातरी कटाक्ष
टाकत रुपाली बोलली.
"ही आमची रेश्मा
बघ...बॉयफ्रेंड मिळाल्यापासून
रुपडंच पालटलंय..अगदी हायफाय
राहायला लागलीये..तुझं काही
होणार नाही..कोण
रेश्मा ? हे बघण्यासाठी
संध्या वळली तर
डोळ्यांवर येणारी बट सावरत
एक मुलगी हसत
होती. "कोणती केशरचना करायची
ही आवड आहे
ज्याची-त्याची..पण प्रेमात
पडण्यासाठी भावना जास्त महत्वाच्या
असतात की हाही
निकष (क्रायटेरिया) असतो?..छे..छे
!! संध्या मनातच म्हणाली . "कसंय
ना ताई, माझ्या
केसांचा पोत (texture) बारीक आणि
लांबी जास्त आहे..रोज एवढ्या
घाईत मोकळ्या केसांचा
गुंता सोडवण्यापेक्षा वेणी
मला जास्त सोयीची वाटते. प्रेझेन्टेबल
वगैरे राहणं समजू
शकते मान्यही
आहे पण comfortable वाटत नसताना
फॅशन म्हणून कदाचित
रोज मी नाही
वावरू शकत अशी.
आणि फॅशनचं काय..उद्या एखाद्या अभिनेत्रीने
घातलेली वेणी प्रसिद्ध
झाली तर तुम्ही
पॅटर्न बनवून नवा ट्रेंड
म्हणून क्लायंट्सला दाखवाल..नाही
का ? हसत हसत
शक्य तेवढं
logical उत्तर द्यायचा तिने प्रयत्न
केला. "असो..शरयू
मला मार्केटमध्ये जायचंय..निघायला हवं..तू
येशील का नंतर..आणि हे
ठेव पैसे..रुपालीताई
हिच्याकडून घ्या दोघींचे.." "अगं
जास्त आहेत ते.." "असू
दे.." शरयूला दटावत संध्या
पार्लरमधून बाहेर पडली.
आता
शरयूकडे मोर्चा वळवत सौ.
रुपाली म्हणाल्या.."काय गं,
वाटलं नव्हतं मला
पण बोलते तर
भारी..काय करते
तुझी मैत्रीण ? "काय
वाटतं, काय करत
असेल ?" शरयूने मुद्दाम विचारलं."करत असेल
कुठेतरी काम..अन
तुला पैसे कसेकाय
दिले तिने ..तुला
तर तिच्यापेक्षा जास्त
पगाराची नोकरी असेल.." रुपालीच्या
तर्कबुद्धीला लगाम लावत
शरयू म्हणाली- "नाही
हो..मी अजून
struggler आहे , स्थिरावली नाहीये अजून.
संध्या २-३
वर्षांपासून IT त
आहे. स्वतः केलेला struggle लक्षात
आहे म्हणून दिले
मघाशी पैसे.अभ्यासातही
आधीपासून हुशार आहे बरं
का माझी मैत्रीण.
शरयू कौतुकानं बोलत
होती. "अगं बाई..हो का
? पण साधी राहते..मी तिला
काहीतरीच समजत होते
गं."
"खरं
सांगू रुपालीताई ? आपण
कधीकधी काही गोष्टींना
नको तसं stereotype करतो.
म्हणजे बघा ना
..IT किंवा
कोणत्याही कंपनीत बरा पगार
मिळवणारी मुलगी ही तिचे
ब्रॅण्डेड/शॉर्ट कपडे, सो कॉल्ड
मॉडर्न समजलं जाणारं राहणीमान
यानेच ओळखली जावी
का ? बरेचदा हे
सगळं त्या व्यक्तीची
वैयक्तिक आवड, निवड
(चॉईस) , मनस्थिती, परिस्थिती, प्राधान्यक्रम
(priorities) यांच्यावर अवलंबून
असतं. घरच्या जबाबदाऱ्या
पार पाडून कामावर
जाणारी एखादी स्त्री कदाचित आपल्या बाळाचा टिफिन
चेक करायला विसरत नाही..पण एकवेळ eyeliner चेक करायला विसरत असेल.एखादी मुलगी आपल्या
शिक्षणाच्या खर्चाचा वडिलांवर पडणारा
भार जाणवून छानसं
मेकअप किट घ्यायची
आपली इच्छा बऱ्याच
काळापासून पुढे ढकलत
आलेली असू शकते.
कुणी आपल्या धेय्यापाठी
प्रयत्न करताना तुमच्या-
आमच्या दृष्टिकोनातून कधीतरी सुंदर दिसायला
कमी पडू शकेल
कदाचित..पण म्हणून
ती व्यक्ती सुंदर
माणूस नसते का
? एखाद्याचं रूप, राहणीमान यावरून
त्याचं स्टेटस/लायकी याबाबत
चुकीचे आडाखे बांधून त्यांना
लेबलं लावण्यापेक्षा तो
माणूस म्हणून कसा
आहे आणि त्याचं
कर्तृत्व या गोष्टी
महत्वाच्या आहेत..नाही का
?आणि आपली एखादी
नकारात्मक टिप्पणी (कमेंट) एखाद्याच्या
मनात न्यूनगंड (कॉम्प्लेक्स)
निर्माण करू शकते.
एखादा बदल जरूर
सुचवावा पण त्यात
हिणवण्याची भाषा नसावी
..असं मला वाटतं.
तुम्ही तर इतक्या
छान ब्युटिशिअन आहात.
आम्हाला सुंदर look देण्याचं
केवढं कौशल्याचं काम
करता..त्याबद्दल आदर
आहेच. आपण आपली
मनंही अशीच खुली
ठेवली तर आपलं
आणि इतरांचं जगणंही
नेहमी 'ब्युटीफुल' राहील..तुमच्या
पार्लरसारखं ! नाही का
?"
" हो गं,
खरंय..आणि मेकओव्हर
काय..कमी वेळातही
शक्य आहे पण
मन ब्युटीफुल ठेवण्यासाठी
काय अप्लाय करायचं
अन काय नाही
हे आपणच ठरवायला
हवं..पटलंय मला.
"
"अगं..उरकलं की नाही
तुझं ?" "हो हो
,आलेच " म्हणत शरयूनं फोन
ठेवला.घरी जाताना
संध्याला मोबाइलमधला एक फोटो
दाखवत ती म्हणाली
-"ही बघ साई
पल्लवी, दक्षिणेतली अभिनेत्री. सुंदरतेची
व्याख्या काही प्रमाणात
बदललीय तिने." " हो सुंदर
अभिनय करते म्हणे.
मागे एका फेअरनेस
क्रीम च्या जाहिरातीला
तिने नकार दिल्याचं
वाचलं होतं."संध्या
म्हणाली. "साधं राहण्याचा
एखादा वेगळा फायदा
सांगू शकतेस का
संध्या ?" "आपलं रूप/श्रीमंती/ऐपत बघून
मैत्री करणाऱ्या लोकांपासून सुटका
होते..मग आमच्या
बागेत सगळी फुलं
सुंदर असतात. गिनी-चुनी..तुझ्यासारखी ! समजलं
का बाळा?" खिदळत
संध्या उत्तरली.
"हो..चल,,
पाणीपुरी खाऊ..म्हणजे
आपली संध्याकाळही होईल-
"ब्युटीफुल "!!! दोघी एकसुरात
म्हणाल्या.
-©अमिता
अशोक पाटील.
