Saturday, 31 December 2016

Miss u...(With Smile...) !!!

          रिवहन महामंडळाची लाल-पिवळी एस.टी पाहिली ना, की बालपणीची आठवण होते. तेव्हा ही एस.टी मला देवदूतासारखी वाटायची. तिच्यासाठी मनात एक खास जागा, आकर्षण अन कौतुक होतं. कारण शहरापासून कित्येक किमी. दूर असलेल्या माझ्या आजोळी, माझ्या गावी, छोट्या खेड्यापर्यंत मला नेणारी ती एकमेव गोष्ट होती.सुट्टी संपवून आम्ही शहरात येताना बसस्टॉपवर आम्हाला निरोप द्यायला बरीच जण यायची. माझी आणि शेजारी- पाजारी राहणारीही एखादी आजी 'लेकरू पुढच्या वर्षीच येईल आता..' म्हणून तोंडावरून हात फिरवायची.त्या सगळ्यांना बघून मनात कालवाकालव व्हायची.काहीतरी व्हावं आणि बस उशिरा यावी किंवा येऊच नये, आई- बाबांनी आपल्यासोबत कायम इथेच स्थायिक व्हावं, किंवा आपल्याला पंख असते तर दर रविवारी उडत उडत इथे येता आलं असतं.. असे अनेक विचार त्या निरागस मनात गर्दी करायचे. गाडी हलल्यावर आपल्याकडे बघत हात हलवणाऱ्या आकृत्या नजरेआड होताना रडू कोसळायचं.गाडी पुढे पुढे जाताना मागे सरकणाऱ्या प्रत्येक झाडाला, शेताला अन घराला प्रेमाने बघत बाय बाय करणं आणि डोळ्यांचं झरणं कितीतरी वेळ चालू राहायचं.घरी परतल्यावर आम्ही भावंडं लगेच कॅलेंडर काढून गावी जाण्यासाठी पुढची मोठी सुट्टी कधी आहे हे पाहत असू हेही आठवतंय. या गोष्टींचं कारण काय? तर- अटॅचमेंट..घरातली कर्ती स्त्री एक दिवसासाठीही घराबाहेर जाताना घरातील इतरांना किती सूचना देते हे पाहिलंय? झाडांना पाणी घालण्यापासून ते कुठल्या डब्यात काय ठेवलंय इथपर्यंत..तुलनेत पुरुष सहसा असं करताना दिसत नाहीत. हे असं का? याचंही कारण - अटॅचमेंट. तिचं मन जास्त गुंतलेलं असतं घरात, झाडांत अगदी तिच्या भांड्याकुंड्यांमध्येही!  
         'गुंतणं' हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे.घरात आणि बाहेरही ,आपल्या भोवतीच्या माणसांत, आपल्या कामात,निसर्गात,परिसरातअन कुठेकुठे गुंतत राहतं मन. मग  ही  अटॅचमेंट तीव्र स्वरूपाची असेल आणि अचानक या गोष्टींपासून दूर जावं लागलं तर तो बदल मन सहजासहजी स्वीकारत नाही. हे वेगळं होणं (detachment) तात्पुरतं असेल किंवा कायमस्वरूपीचं, कारणंही वेगवेगळी असतील. पण बदल हे अपरिहार्य असतात आणि बरेचदा आवश्यकही. मोठ्या लेखकांनी 'आठवण ही एक वेदना आहे' असं लिहून ठेवलंय. पण detachment  होऊनही मन पुन्हा गुंतणं सोडत नाही..हेही तितकंच खरं आहे.सुट्टी संपल्यावर शाळेत जायला कुरकुरणारे आपण पुन्हा गुंतलो होतोच ना- नव्या गणवेशात, नवीन पुस्तकं, वह्या पहिल्यांदा हातात पडल्यावर घेतलेल्या सुगंधात, मित्र-मैत्रिणींमध्ये, शाळेत आणि आपल्या छोट्या विश्वात! आयुष्यात पहिल्यांदा आपल्या माणसांना सोडून घरापासून दूर हॉस्टेलला जाताना अडखळणारी माझी पावलं - शिक्षण संपून पुन्हा आपल्याच घरी परतताना पुन्हा एकदा थबकली होतीच..काहीतरी मागे राहतंय आणि आपण हे miss  करणार..ही भावना होतीच. एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणाऱ्या बऱ्याच जणांना असा अनुभव असेल. वडिलांच्या नोकरीमुळे १६ वर्षांच्या वास्तव्यानंतर अहमदनगरहुन पुण्यात स्थलांतरित होणं हा बदल माझ्यासहित माझ्या कुटूंबाला लगेच मानवला नाही. पण नवीन ठिकाणी पुन्हा नवीन माणसं जोडली जातात आणि हळूहळू बदल स्वीकारला जातो. 
    आता जेव्हा जेव्हा प्रवासात अहमदनगरहून जाण्याचा योग्य येतो तेव्हा तेव्हा तिथल्या सगळ्या  आठवणी पुन्हा जाग्या होतात . तिथे पुन्हा जाण्याचं निमित्त आता माझ्याकडे नसलं तरी त्या शहरानं मला भरभरून दिलंय. त्यामुळे तिथून जाताना ती कृतज्ञता, ती आपुलकी (मी मूळची नगरकर नसले तरीही ) आपसूकच वाटते. मनात  "Miss u .." ही भावना असतानाही चेहऱ्यावर स्मितहास्य अर्थात smile उमटतं. 'Miss u' हे त्या गोष्टींविषयीची कृतज्ञता आणि त्या गोष्टी आपल्या आठवणीत आहेत हे दर्शवतं तर 'smile' हे आपण बदलाला दिलेली स्वीकृती दर्शवतं.बदल न स्वीकारता भूतकाळात जगणं योग्य नाहीच पण म्हणून तुमच्या मनात असलेली त्या गोष्टींची आठवण दडवून ठेवणंही योग्य नाही. कारण भावना माणसाला संवेदनशील बनवतात आणि माणुसकीकडे घेऊन जातात. त्यामुळे असं वाटण्यात गैर काही नाही.थोडक्यात- आयुष्याच्या पुस्तकात एक-एक नवीन पान लिहीत राहायचं तर आहेच पण म्हणून मागची पानं चाळायला आणि त्यात सुंदर आठवणींची मोरपिसं जपून ठेवायला मनाई थोडीच आहे?एखाद्या कठीण प्रसंगी ही मागची पानं तुम्हाला बळ देतील आणि ही मोरपिसं सुखावून जातील. 
   आपल्या सहवासात येणाऱ्या आणि कालांतराने आपण ज्यांना मिस करतो अशा गोष्टी, जागा, व्यक्ती या सर्वांनी आपल्या अन त्यांच्याही नकळत आपल्याला खूप काही दिलेलं असतं. तुम्हीही कधी अशा बदलांमधून गेला असाल (राहण्याच्या, कामाच्या ठिकाणातला बदल किंवा वैयक्तिक पातळीवर कुठलाही बदल ) आणि हा 'Miss u' फॅक्टर तुमच्याकडे असेल तर नाराज होऊ नका. उलट हा  'Miss u' फॅक्टर जेवढा जास्त असेल तेवढं तुम्ही आजवर मिळवलंय.आणि तुमच्याबद्दलही इतरांना असं वाटत असेल तर विश्वास ठेवा..तुम्ही खूप कमावलंय! त्या क्षणांचं हे देणं तुम्हाला लाभलंय, ज्यांनी तुमची ओंजळ भरलीय, ज्यांनी तुम्हाला आधीपेक्षा जास्त समृद्ध केलंय. आणि सध्याही तुम्ही बदलातून जात असाल तर भविष्यात ही समृद्धी अजून वाढणार आहे. कारण परिस्थिती, आव्हानं सोपी असतील किंवा अवघड; आपण आज भरभरून जगलेला प्रत्येक क्षण उद्या या 'मिस यु' फॅक्टरवाल्या क्षणांमध्ये जमा होणार आहे.   
  खूप थोडे क्षण जे कधीही आठवणींत जमा होऊ नयेत असं वाटतं ते आपण पुन्हा पुन्हा जगत राहतो. पण त्यावर मर्यादा आहे.एका बाबतीत आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो. क्षणांना थांबवू शकत नसलो तरी किमान काही क्षणांना,आठवणींना थोड्या वेळासाठी का होईना आपण पुनरुज्जीवित करू शकतो. यालाच 'मेमरी रिक्रिएशन' म्हणता येईल. आज हे सहज शक्य आहे. कारण- म्हटलं तर आपण एकमेकांपासून दूर आहोत आणि म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावर..परवा माझ्या कॉलेजमध्ये आम्हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा(get together)  पार पडला. तिथेही जाणवलं- प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे पण पुन्हा सर्वांना भेटून छान वाटलं. तिथे मला भेटलेले सर्वजण काय करत होते ? - 'मेमरी रिक्रिएशन'! आठवणींनाही सेलिब्रेट करता येतं, त्यांचाही सोहळा होऊ शकतो, हो ना ?
   बदल सहजासहजी स्वीकारायला तयार नसणाऱ्या माझ्या मनाने स्वतःच्याच प्रश्नांना दिलेली ही उत्तरं मी तुमच्यासोबत शेअर करतेय. या गोष्टींकडे अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर आठवणी या वेदना राहणार नाहीत , त्यांची अत्तरकुपी होईल. मनाच्या कपाटात साठवलेली अत्तरकुपी. जेव्हाही उघडावी- मनभर आठवणींचा सुगंध दरवळावा, तुमच्या चेहऱ्यावर दिसावा, तुम्हाला आणि तुमच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना आनंदी करून जावा. चांगल्या, सकारात्मक आठवणींची ही अत्तरकुपी आपल्या संग्रही असायलाच हवी .किंबहुना ती आहेच फक्त तिची जाणीव मनाला एकदा व्हावी.
    नवीन वर्षात अर्थात २०१७ मध्ये  पुन्हा भेटू आणि भेटत राहूच आपण. तेव्हा नवीन वर्षात पदार्पण करण्यापूर्वी एकदा आठवून पहाच आणि अशा सगळ्या क्षणांना एकदा मनापासून म्हणाच- "Miss u...(With Smile...) !!!"
Happy New Year to all....!

Saturday, 29 October 2016

सलाम...

Sunday, 9 October 2016

पैसा...


आज जब हमने अपना बटुआ खोला
हाथ आतेही पैसा बोला-
"रखना मत, कुछ पुछना है तुमसे
बताओ क्या तुम्हे पता है ?
इन्सानों के लिए तो सुना था
पर क्या हमारे लिए भी कोई...ब्युटी पार्लर होता है ?
बरसों से कहते आए लोग कि पैसा बोलता है
पर सुना है अब तो काला पैसा सफेद भी होता है !
हमने कहा- " सुन पैसे,
यहा कोई पैंसों से खाता है
तो कोई पहले पैसा ही खाता है
कोई नेकी से कमानेवाला
तो कोई दुसरों की दौलत पे हक जमानेवाला
इसीलिये तू कही सफेद है और कही काला..
काले पैंसों से चीजें तो मिलती हैं पर चैन नहीं
सुख मिलता है पर सुकून नहीं
शोहरत मिलती है पर सच्चा सम्मान नहीं..
कमाया जो कुछ, सब यही छोडके
कमानेवाला एक दिन जायेगा
जिनके लिए कमाया वो भी नहीं जा सकतें
पैंसों का गुमान क्या खाक साथ जायेगा ?
सच है, बहोत कुछ होता है पैंसों से
पर फिर भी पैसा ही सबकुछ नहीं होता
नहीं तो कोई गरीब कभी चैन से नहीं सोता
और कोई अमीर महलों में नहीं रोता..
कम हो या ज्यादा,
नियत साफ तो पैसा भी साफ है
आखिर पैसा तो पैसा है
बुरे और अच्छे - हम और आप है.."
ये सुनके वो बोला -
समझा पूरी बात, अब बटुए में रहता हूँ
उसके पहले बस एक बात कहता हूँ
" यूँ  तो दुनिया दिवानी है मेरी
फिर भी ये पैसा डरता है
कि कोई, अपनी करतूतोंसे मुझे बदनाम न कर दे
दुवा है मेरी बस यही
मुझे काले से सफेद करनेवालों के दिलों में भी
कोई वो सफेदी भर दे
कोई वो सफेदी भर दे...!"
                                       - अमिता

Saturday, 1 October 2016

प्रासंगिक..

सलमान,
      तुझा अभिनय मला आवडतो तरीही मी हे बोलतेय. IMPPA (Indian Motion Pictures Producers Association) ने पाकिस्तानी कलाकारांवर तात्पुरती बंदी आणली. तू म्हणालास, 'they r artists,not terrorists' बरोबर आहे.IMPPA च्या एका सदस्याने यावरून राजीनामाही दिलाय. सर्वांना मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे पण तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की आपण त्यांना दहशतवादाला support करणाऱ्या देशाचे नागरिक म्हणून नाकारतोय.तेही शांततेत, डोक्यावर बंदूक ठेवून नव्हे..
      तू पुढे म्हणालास 'We want love and peace'  कुणालाही युध्द नकोय. जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर(reaction) army ने surgical strike ने दिलंय आणि आपण सामान्य नागरिक हा निषेध नोंदवत आहोत असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत..हे सांगण्यासाठी. कारण आपण कलाकार ,engineer, doctor,etc. नंतर, पण आधी भारतीय आहोत.ज्यांच्यासाठी तू हे बोलतोय त्यांच्या देशात नाहीत का स्वतः ला संवेदनशील, अमन को चाहनेवाले  वगैरे समजणारे लोक..त्यांनी आणि ज्यांना आतापर्यंत त्यांचं  bread& butter भारतात मिळत होतं त्यांच्यापैकी एकाने तरी उरी इथे झालेल्या हल्ल्याविषयी खेद व्यक्त केला ? आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही असं म्हणणाऱ्या त्यांच्या सरकारचा जगाला माहीत असलेला खोटारडेपणा यामुळे अधोरेखित होतोय.
     आपल्या जीवावर उदार होऊन surgical strike केलेल्या सैन्याला तशी हौस  थोडीच आहे ? there r reasons भाई! सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया पूर्णपणे  बंद झाल्या तर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची आपली संस्कृती आपण पुन्हा जपू.
     तूर्तास तरी तू आपल्या मोठ्या मनाचा उपयोग फक्त देशबांधवांसाठी आणि फार तर पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशासाठी कर. तू काहीतरी बोलायचं आणि नंतर सलीम सरांना त्यासाठी माफी मागायला लागावी हे आम्हालाही नाही आवडत..आशा करते तुला समजेल..की English मध्ये सांगू ? Please accept the fact and demand of a situation. Don't be extra nice to them.keep calm and hope for better. Jay Hind!
#PakistaniArtistsBanned
#NationComesFirst

Wednesday, 21 September 2016

निरोप…

पुरे टिपटिप किती बरसशील  
भास्करही आता निजला गं..
हिरवा शालू या धरेचा
आसवांनी तुझ्या भिजला गं..
उगवणाऱ्या प्रत्येकाला इथे प्राक्तन अस्ताचं
बरसणं तेव्हाचं अन बरसणं आताचं
आली होतीस- ढगांच्या गडगडाटात
विजेच्या कडकडाटात अन वाऱ्याच्या साथीनं..
आता एकटीच..
जशी देवघरात उदबत्ती जळते आहे
माहेरवाशीण मुलगी जणू
चोरटे अश्रू ढाळते आहे..      
कधी रिमझिम कधी झरझर
धो धो कधी बरसलीस तू
कुठे नाचलीस, कुठे साचलीस
कधी दडून मग पुन्हा फिरलीस तू
विहिरींच्या गळ्यात,माझ्या मळ्यात
बहरल्या रानात, भिजल्या मनात
अन पानापानात उरलीस तू... 
फुले फुलली, पिके डोलली
बळीराजाची कळी खुलली
दोन हातांनी उदंड देऊन
वर्षाराणी परत चालली..
रिते करुनी घट मेघांचे
जाशील तू..
पाहता पाहता दिसेनाशी होशील तू..
निरोप घेतानाही लाडके, तू हसत जा
वाट तुझी पाहत असेल
प्रिय तुझा वरुणराजा..
ओढ तुझी लावील सृष्टीला 
घडी हीच निरोपाची 
पुढल्या वर्षी कळव पुन्हा
खुशाली तुझ्या संसाराची
                                                  - अमिता

Monday, 12 September 2016

इंतजार...





इंतजार की घड़िया शायद ही कोई पसंद करता है
पर ये भी सच है कि
कोई सब्र से, कोई बेसब्री से, कोई डर से तो कोई धीरज से
यहा हर कोई किसी किसी का इंतजार करता है..
धरती को बरसात का, चाँदनी को रात का
होठों को बात का इंतजार..
सवालों को जवाब का, अंधेरे को आफताब का
और काबिलीयत  को किताब का इंतजार..
चाँद को पूनम का फुलोंको शबनम का
गीत को सरगम का इंतजार
कलियों  को सुबह का और पहेली को वजह का इंतजार..
ख्वाबों को उम्मीद का, जुनून को जीत का
तनहा दिल को मीत का इंतजार       
दिये को बाती का और अकेले को साथी का इंतजार..
बागों को सावन का, घटा को पवन का
तो किसी राधा को मोहन का इंतजार...
भक्त को भगवान का, यजमान को मेहमान का
कलाकार को कदरदान का इंतजार..
चोर को मौके का, पुलिस को खबर का
तो आशिक को एक नजर का इंतजार
कश्ती को साहिल का और राही को मंजिल का इंतजार...
ये घड़िया होती भी बडी अजीब हैं
आसानी से कटती भी नहीं
और खत्म होने के बाद यादों से हटती भी नहीं..क्यों ?
क्योंकि-
' कोई आयेगा ' ये विश्वास हैं इंतजार
आनेवाला 'कीमती' हैं ये एहसास है इंतजार..
कोई कहे वक्त की शरारत और
हमारी रुसवाई है इंतजार
पर शायद..
जिंदगी की तेज रफ्तार से थककर
वक्त भी लेता होगा कभी
वो अंगडाई है इंतजार...!!!        
                                          - अमिता 
  

Monday, 22 August 2016

घरोंदा...




निकले थे घर से
कुछ पाने  कि कोशिश करने
पर एक दिन घर आने के लिये भी
कोशिश करनी होगी, पता था..
कुछ सुलझाने चले थे मगर
खुद इतना उलझ जायेंगे, पता था..
हररोज गुजरते थे कभी जहाँ से
वो राहे, वो चौराहा
आज बेगाना लगता है
अपनेही घर में मेहमान बनना
किसे अच्छा लगता है ?
चार दिन यू बीतते हैं
जैसे हाथों से फिसली रेत हो
वक्त की चिडियाँ ने जैसे
चुग लिया मेरा सुहाना खेत हो..
घर की दीवारें और वो प्यारी-सी आँखे
बिना बोले ही हमें रोकती हैं
दिल अभी भरा नहीं होता
और कंबक्त लौटने की घडी टोंकती हैं..
दिल वादा करता है उनसे-
अब आयेंगे तो ऐसे आयेंगे
कि फिर से जाना हो
मिलेंगे तो ऐसे मिलेंगे
कि फिर से बिछडना हो.. 
अपनी चीजों के साथ
कई बातें,कई यादें समेटते है
घर को आँखों में बसाके
फिर से उलझने के लिये लौटते है..
दिल कहता है- थोडी मेहनत और कर ले
ताकि वादा पूरा कर पाए
हर बार घर ना जा सके
तो किसी दिन घरको ही साथ ले आए..      
इसीलिये तो बडी शिद्दत से
एक-एक तिनका वो जुटाता है
हर नया दिन
इसी ख्वाब पे लुटाता है
घरोंदे की ताकत से ही
पूरी दुनिया में उडता परिंदा है..
घरोंदे के लिए ही आखिर
वो छोडता घरोंदा है....!
                                           - अमिता