Tuesday, 19 July 2016

हिसाब

गुजरा हुआ वक्त तो हाथ नहीं आता
पर गुजरते हुए वक्त से बात हुई
बात क्या..बहस ही हुई...
हुआ यूँ ,कि उसने हमसे हिसाब माँगा
और कहा- बहुत कुछ खोया है तुमने!
खोया होगा बहुत,
पर कुछ पाया भी तो है
वक्त ने साथ नहीं दिया तो क्या..
कुछ लोग फिर भी साथ  थे
मायूस करनेवाले होंगे कई
पर हौसला बढानेवालें भी कुछ हाथ थे
हाँ ,धूप  में जलें होंगे पाँव 
पर सिर पे ममता की छाँव नहीं देखी ?
हमें लड़खड़ाते हुए देखा तुमने
पर चलने की जिद नहीं देखी ?
किसी एक पल में इतना पाया..
प्यासे को मिलने जैसे समंदर आया.. 
उस विश्वास ने, ममता और प्यार ने, उन दुवाओंने 
मांगा है कभी हिसाब ?
सूरज की किरणोंने, बरखा की बुंदोंने,     
इठलाती हवा ने मांगा है कभी हिसाब ?
हम इन्सानों के बीच रहकर 
तूने भी कर दी ना छोटी बात..?
तो सुन.." हम किताब पढनेवालों में से है 
पन्ने गिननेवालें नहीं 
सफर करनेवालों में से है 
पीछे हटनेवालें नहीं 
हमसे हिसाब मांगनेवाले..
खुद तेरा भी तो हिसाब हो रहा है
आखिर एक कल के जाने के बाद 
एक और कल भी तो आ रहा है.."
बहस खत्म हुई दोस्तों,
अब वो शांति से जा रहा है 
और जाते जाते हमसे 
हल्का-सा मुस्कुरा रहा है...| 
                                      - अमिता 

Friday, 1 July 2016

ओळख...(गोष्ट पावसातली...)

     परवा तुझा मेसेज आला -Hi. how r u.. म्हणजे मी या जगात आहे आणि तुझ्या परीघातल्या लोकांमध्ये माझं छोट्या बिंदुएवढं का होईना अस्तित्व आहे हे कळलं. खरंच बरं वाटलं. तुला आठवतो का गं तो पाऊस?ऑफिसच्या खिडकीतून त्याला पाहत तू मला म्हणाली होतीस -" रेणू, मला खूप आवडतो पाऊस.." तो वळवाचा पाऊस होता. ध्यानीमनी नसताना आलेला..अचानक. तुझी- माझी ओळखही अशीच झाली होती. चुकूनही वाटलं नव्हतं - त्या वळवाच्या पावसासारखीच हळूहळू पुसट होत जाईल आपली ओळख. आता पाऊस सुरू झाला तशी मला तुझी जरा जास्तच आठवण येतेय.
    तू आणि मी एकाच दिवशी रुजू (join) झालो होतो ऑफिसला. ऑफिसमध्ये, रिसेसमध्ये सोबतीची सवय झाली. मग कितीतरी गोष्टी शेअर करू लागलो. आई- बाबांच्या माघारी स्वतःला आणि भावाला किती धीरानं सावरलंस तू,या गोष्टीचं मला नेहमीच अप्रूप वाटायचं. आजही वाटतं. कधीतरी त्यांच्या आठवणीत पाणावलेल्या डोळ्यांनी तू मन मोकळं केलं की मलाही हायसं वाटायचं.
      आता तू दुसऱ्या ऑफिसात आहेस. आलिशान इमारती, चकाकणाऱ्या काचा यांच्या आतही काही तीच कपटी, धूर्त आणि सत्तेसाठी,स्वार्थासाठी हपापलेली माणसं असतात हे गावीही नसतं आपल्या.पॉलिश्ड  राहणीमान, बोलणं यांनी हे लपवलं जात असेल कदाचित पण हळूहळू ही एकेक पुटं बाजूला होऊन खरे चेहरे समोर येतात. इंटर्नल पॉलिटिक्स गृहीत धरूनच पाय ठेवतो आपण या जगात. पण या संघर्षात कारण नसताना, इमाने-इतबारे काम करणाऱ्या तुझ्या-माझ्यासारख्या लोकांना वेठीस धरलं जातं तेव्हा खरंच असह्य होतं. जमत नसेल तर नवरा-बायकोसुद्धा कायदेशीर नोटिस देऊन वेगळे होतात- हा जमाना आहे सध्याचा. तरीही बिझनेस पार्टनरशिपचे वाद समोरासमोर बसून चर्चा करून न सोडवता फालतू गटबाजी करणारी लोकं पाहिली. स्वतःला प्रोफेशनल म्हणवून घेणाऱ्या लोकांनी असं गल्लीतलं राजकारण करावं आणि त्यात विनाकारण इतरांना ओढावं याचा खूप राग येत होता.
    स्वतःच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधता येतात पण हे प्रश्न दुसऱ्यांनी आपल्या आयुष्यात उभे केले असतील तर उत्तर शोधायला वेळ लागतोच. आणि बरेचदा तर येणारी  'वेळ' हेच काही प्रश्नांचं उत्तर असतं. शेवटी झालं एकदाचं सेपरेशन-business split up. पण चर्चा थांबल्या नाहीत. कोण या पार्टीचा, कोण त्या..कोण हेर, बातम्या कशा, कुठून जात होत्या..एक ना दोन अनेक..आधी प्रत्येक वेळी तू सोबत होतीस.  कितीदा बोललो असू हे वाक्य- 'we are here to get experience.' आपण ठरवलं होतं- या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. पण नंतर संवाद थांबला. skype च्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुझ्या नावासमोर 'This person has not shared their details with you.' या एका वाक्याने तू शेअर केलेल्या सगळ्या गोष्टी पुसून नाही टाकता आल्या गं मला..आणि बहुधा तुलाही नाही.
     यापुढेही असे अनुभव येऊ शकतात. प्रत्येक वेळी भावनिक होऊन मानसिक तणाव न घेता स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेऊन धैर्यानं सामोरं जायचं हे शिकता आलं. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींची गल्लत होऊ नये हे तुलाही पटलं असावं. चूक तुझीही नव्हती अन माझीही पण ओळखीतून मैत्रीपर्यंत विणले गेलेले धागे विरले आहेत हे खरं.एकमेकींशी असलेली ओळख नाकारण्यापर्यंत गेलेला हा प्रवास पुन्हा एकदा ओळखीच्या वळणावर आहे. पुन्हा कुठे भेटलीस तर माझी पूर्वीच्या ऑफिसातली सहकारी, मैत्रीण म्हणणार नसशील तरी आपली किमान ओळख आहे हे तू नाकारणार नाहीस याचा आनंद आहेच. पण खरं सांगू, आयुष्यात येणारी सगळी नाती, सगळी माणसं आयुष्यभर थोडीच पुरतात ? त्यामुळे काळानुसार दूर जाणाऱ्या व्यक्तींनी तसं करूच नये ही वेडी अपेक्षा माझी नाहीच मुळी..फक्त परस्परांच्या मनात कुठलीही अढी, कटूता असू नये एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. अगदी मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून अन माझ्याकडूनही. मनात कटूता नसेल तर भविष्यातही प्रत्यक्ष भेटीत औपचारिकतेच्या खोट्या कुबड्यांची गरज भासत नाही.    
    मनाच्या कोपऱ्यात थोडीही कटूता असेल ना तर वाहून जाऊ देत ती या धो धो बरसणाऱ्या पावसात. हेच..फक्त हेच सांगायचंय मला या पावसात… 
                                             रेणू .                                                                                 
                                                                             






(टीप - सर्व पात्र काल्पनिक आहेत.)