F.C. रोड..(फर्ग्युसन
कॉलेज
रस्ता)..नेहमीप्रमाणेच
गजबजलेला.दिवस
मावळतीकडे
झुकत
चालला
होता
पण
अजूनही
उन्हाची
काहिली
कायम
होती.
रणरणत्या
उन्हातही
कमी
न
झालेला
कोलाहल
कधीकधी
जास्त
कासावीस
करतो.
दूर
कुठेतरी
शांत
जागी
जावं
असं
वाटू
लागतं.या
गर्दीतून
जातानाच
एक
सुरेख
धून
ऐकू
आली.उन्हात
तळपलेल्या
जीवावर
कुणीतरी
हळुवार
फुंकर
घालावी
अशी..सूर
इतके
सुंदर
लागले
होते
कि,
शब्द
आपसूकच
ओठांवर
आले-
ये शाम
मस्तानी,
मदहोश
किये
जाए..
मुझे
डोर
कोई
खींचे,तेरी
ओर
लिए
जाए...
शब्द नव्हतेच..होते
फक्त
बासरीचे
मधुर
सूर.आणि
माझ्या
नकळत
मी
तिथे
जाऊन
पोचले.
गाण्याची
दुसरी
ओळ
वेगळ्या
अर्थाने
खरी
झाली
जणू.साधारण
साठीतला
एक
माणूस
डोळे
मिटून
बासरी
वाजवत
होता.
रस्त्याच्या
कडेला
चटईवर
बसलेला.येणाऱ्या-जाणाऱ्या
लोकांपैकी
कुणी
आश्चर्याचा,
कुणी
सहानुभूतीचा
कटाक्ष
टाकून
पुढे
जात
होती.
कुणी
पुढ्यात
पैसे
ठेवत
होतं.
दुनियादारी
आपल्याला
काय
काय
शिकवते
ना..माणसाच्या
अवतारावरून,
दिसण्या-कपड्यांवरून
आणि
खिशातल्या
पैशांवरून
त्याची
कदर
करायला
शिकवते.सुरांनी
आकर्षिलं
होतंच
पण
का
बरं
बसला
असेल
इथे हा माणूस?
समोर
पैसे
पडतायेत,
हा
निश्चल.पण
नाकारतही
नाहीये..शेवटी
कलाकारालाही
पोट
असतंच
ना..एव्हाना
विचारांचं
जाळंच
विणून
झालं
होतं
मनाशी.
खरं तर
माझं
काहीही
काम
नव्हतं
तिथे.
पण
उगाच
मोबाईलशी
खेळत
होते
.कान
बासरीकडेच.
राजेश
खन्नांवर
चित्रित
झालेली
किशोरदांची
गाणी
वाजवत
होता
तो.
एक
गाणं
झाल्यावर
क्षणभराचा
विराम
घेऊन
दुसरं
गाणं.
हम
दोनो,
प्यार
दिवाना
होता
है
आणि
अजूनही
एक
से
बढकर
एक
गाणी
वाजवली.आता
मलाही
निघायला
हवं
होतं.कान
तृप्त
झाले
होते
पण
मन
नाही.
राहवलं
नाहीच.
जवळ
गेले.
एवढ्या
सुंदर
कलेचं
मोल
एखाद्या
नोटेनं
कसं
होईल?
सच्चा
कलाकार
पैशांचा
नव्हे
तर
कलेच्या
सन्मानाचा
भुकेला
असतो.
लोक
कदाचित
त्याला
वेडा
समजतील,
त्याच्या
कफल्लकतेवर
हसतील.
पण
तो
जे
कमावतो
ना
ते
पैशात
नसलं
तरी
त्याच
मोल
खूप
असतं
आणि
हे
फक्त
तोच
जाणतो.
काही
लोक
गरिबी-श्रीमंतीच्या
मोजपट्ट्या
लावतील,
कमाईच्या
तराजूत
तोलतील..पण
तो
कधीच
या
साऱ्याच्या
पलीकडे
गेलेला
असतो.
का
कुणास
ठाऊक
,मला
हा
कलाकार
मनस्वी
वाटला.
मी पैसे
ठेवले.
त्याने
डोळे
उघडले.
नजरानजर
झाली.
"काका,
खूपच
छान
वाजवता
तुम्ही!"
"धन्यवाद
बेटा..!"
अदबीनं
मान
झुकवत
ते
उत्तरले
.मावळत्या
सूर्याच्या
साक्षीनं
त्यांच्या
चेहऱ्यावर
झळकणारं
हसू
पाहिलं.वाटलं-
दोन
सूर्य
सांगतायेत-
मावळतोय
म्हणून
काय
झालं..अजूनही
तेच
तेज
आहे
माझ्यात
! "तुम्ही
कार्यक्रमांमध्ये
वाजवता
का
?" "छोटा कलाकार आहे..बोलावतात
तिथे
जाऊन
वाजवतो.
सध्या
काम
कमी
आहे.
नेहमीच
असतं
असं
नाही.
मग
इथं
येऊन
बसतो.
तेवढाच
माझा
रियाजही
होतो. "खरंच फार
सुंदर
वाजवलंत.
"धन्यवाद,
खूप
खूप
धन्यवाद!"
वयाने
स्वतःपेक्षा
खूप
लहान
आणि
संगीताची
जाण
नसलेली
एका
अनोळखी
मुलगी
दाद
देते
आणि
तिचा
एवढ्या
अदबीनं
स्वीकार!
कलाकार
जेवढा
मोठा
तेवढा
तो
नम्र
असतो.
"अर्ध्या
हळकुंडानं
पिवळं
होऊ
नकोस.."
असं
सांगून
जातात
अशी
माणसं.
कला हे
व्यक्त
होण्याचं
एक
माध्यम
आहे.
कधीकधी
ती
माणसाला
जगवतेही
पण
त्याहीपेक्षा
त्याच्यातल्या
चांगल्या
माणसाला
घडवते.
निसर्गाच्या,
परिस्थितीच्या
चटक्यांमध्ये
गारवा
देते
आणि
इतरांनाही
तो
देऊन
सुखावण्याचं
सामर्थ्यही.
थोड्या
वेळापूर्वी
शांत
ठिकाणी
निघून
जाऊ
म्हणणारी
मी
अद्याप
तिथून
निघू
शकले
नव्हते,
यात
सगळं
आलं.
आता
बहुधा
शेवटची
धून
सुरु
झाली
होती.
तीच
- ये
शाम...रणरणता
दिवस
जाताना
जास्त
आल्हाददायक
झाला
होता
आणि
शाम
हळूहळू
मस्तानी
होत
होती...मी फोटोबिटो
काढला
नाही,
पण
मनाच्या
कॅमेऱ्यात
क्लिक
झालाय..कायमचा...
अशा
सर्व
ज्ञात-अज्ञात
मनस्वी
कलाकारांना
सलाम...!
(घरी
पोचल्यावर
कुणीतरी
विचारलं-
कसा
होता
दिवस?
मी
म्हणाले
-"दिवस
नेहमीसारखाच..पण
शाम..
कमाल
होती...!!"
)
-अमिता
