Sunday, 16 April 2017

माहितीये ना तुम्हाला..
गुराढोरांसारखाच इथे मुला-मुलींचाही बाजार भरतो
मांडवात जाण्याआधी गरीब बाप
मुलींसोबत पदोपदी हरतो
बहिणींच्या लग्नात हे पाहूनही ...
पठ्ठा हुंड्यासाठी कसा अडतो
शिकून नोकरी करणाऱ्यांचा भाव तर गगनाला भिडतो..
बख्खळ सोनं अन लाखा-लाखांमध्ये
इथे नवरदेवाचा भाव आहे
पण माहितीये का तुम्हाला
परवा हुंड्यापायी लातूरची जी लेक गेली ना,
तिच्या शेवटच्या चिट्ठीत - ' तुमचं-आमचंही ' नाव आहे...



#SayNoToDowry
#शक्य_असेल_तर_हुंड्याला_नाही_म्हणा_घ्यायचाच_असेल_तर_प्रमाणात_घ्या
-अमिता.
मी ऐकलंय कोकणात ही पद्धत कमी आहे.आणि विशेषतः कोकणातले शेतकरी हुंडा देत-घेत नाहीत. मराठवाड्यात तर हे प्रमाण भयंकर आहे..माझ्या माहितीप्रमाणे खान्देश-विदर्भातही आहेच.कुणी कोकणातलं असेल तर सांगावं..काही अपवादही असतात..अशा लोकांनी हुंडा न घेतल्याने काही नुकसान झालं का तेही कृपया शेअर करावं.

No comments:

Post a Comment