Sunday, 18 February 2018



थिजून जातो  दरबार ऐकताच
"सिवाजी..जिंदा या मुर्दा..कौन ला रहा है?"
निर्वतल्यावर शत्रूही म्हणतो..
"या खुदा..तेरा नेक बंदा आ रहा है.. !"
छाटून बोटे अन्यायाची, स्वराज्य केले खडे
बेड्या सोडवण्याची ताकद दिलीस,
तेव्हा मराठी पाऊल पडते पुढे...
दौलतखान, इब्राहिमखान, जिवा महाला,
बाजीप्रभू अन तानाजी..किती करावी गिनती
माणसे कमावली ज्याने जाती-धर्माच्या तोडून भिंती..
धन्य झाल्या जिजाऊ अन धन्य झाली महाराष्ट्राची माती,
"अशीच आमुची आई असती सुंदर, तर आम्हीही झालो असतो सुंदर"
वदले जेव्हा शिवछत्रपती...!
नावाने ज्याच्या चैतन्याचा झरा सळसळतो
गड आला तरी सिंहासाठी..राजा आपुला हळहळतो..
वाघाच्या या काळजाने..माउलीसम जपली प्रजा..
कणखर सह्याद्रीही लवून म्हणतो..
जय जय शिवाजीराजा...!
जय जय शिवाजीराजा...!!!
                                                                                                 -अमिता

                                                                                                 sketch by- नम्रता पाटील (Thank u!)
पराक्रमी माणूस संवेदनशील असला आणि राजा असा असला तर काय होऊ  शकतं याचे मूर्तिमंत आदर्श  उदाहरण म्हणजे -महाराष्ट्रच्या अन भारताच्या शिरपेचात दैवाने खोचलेला मानाचा तुरा , किंबहुना तो शिरपेचच -जिजाऊंचे, मावळ्यांचे शिवबा , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते -छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..विनम्र अभिवादन!
 

No comments:

Post a Comment