पसंत नाही सांगा कुणा,
सख्याचे लोभस हसणे ?
नसतानाही निशा आठवे चांदव्याचे असणे..
कुणी म्हणेल वेडी, उगाच का झुरते
पण या पुनवेचे चांदणे तिला, त्या पुनवेपर्यंत पुरते...
कोर-कोर विश्वासाची, पाठवून निशा ही ढळते
अन चांदव्यासंगे नभाला, भाषा मौनातली कळते...!
#यूँही_चाँद...
-अमिता
No comments:
Post a Comment