बालपणी कितीदा खायचो रे
सोबतीने चिमणचारा
जसाच्या तसा आठवतो
मला अजूनही भूतकाळ सारा...
सोबतीने चिमणचारा
जसाच्या तसा आठवतो
मला अजूनही भूतकाळ सारा...
किती हाका दिल्या तुला
पण तुझी साद नाही आली
खरं सांग, इतक्या वर्षांत
एकदाही माझी याद नाही आली..?
पण तुझी साद नाही आली
खरं सांग, इतक्या वर्षांत
एकदाही माझी याद नाही आली..?
गाव काय नि शहर काय...मी सर्वांची होईन
जपणार असशील मला तर..तू जाशील तिथं येईन
चिमण्या-चिमण्या चोचीने
पुन्हा दाना-पाणी घेईन
तू बोलावशील प्रेमानं..तर मी नक्की येईन
तर मी नक्की येईन...
जपणार असशील मला तर..तू जाशील तिथं येईन
चिमण्या-चिमण्या चोचीने
पुन्हा दाना-पाणी घेईन
तू बोलावशील प्रेमानं..तर मी नक्की येईन
तर मी नक्की येईन...
- तुझीच,
चिऊ ...
चिऊ ...
#मार्च २० - जागतिक चिमणी दिन
- अमिता

Tuzya kavitechya hya paanabarobarch... Vadhat janar tuzya lekhan pratibhech zaad asach baharat jaao ani amha vachakroopi chimanyananche thave chya thave yevot hi subhechha!
ReplyDeleteTu pudhchya divasala pn cover kel 👇
March 21: Jagtik kavita din 😇
wah.. :)an Pratibha wagaire kahi nahi..he simple lihilay.Thanks for kind words!
Delete