घराजवळच्या मंदिरातला घंटानाद, देवघरात तेवणारी वात, घराच्या पायर्या चढउतार करतानाची लय..गिरणी, बाजार, नेहमीचं किराणा दुकान, ड्रेस अल्टर करून देणाऱ्या काकू, रोज स्वतःशी केलेली कामांची यादी, माझा परिसर, माझे लोक.. अंगणातली तुळस, कुंडीतली फुलं,आईचा स्वर, बाबांचा वावर, आजवर चालत आलेली रोजची वाट...सारं सारं आठवत..काळजात साठवत असते सासरी जाणारी लेक.
अशीच माणसं, अशाच गोष्टी, असेच क्षण देईल का नवी वाट? ही नवी वाट पुढ्यात असताना रोजच्या सवयीच्या वाटेवर पाऊल थबकतं ना..तेव्हा तिच्या शब्दकोशात एका शब्दाची भर होते. तो म्हणजे - ' माहेर '. काही देण्यासाठी, काही मिळवण्यासाठी, एकाच वेळी भरलेली आणि रिती ओंजळ घेऊन दोन घरांची समृद्धी इच्छिते सासरी जाणारी लेक.
#दिलसे...

No comments:
Post a Comment