लेक आली माहेराला
आंबेरसाच्या येळी
लई बरसंल म्हणे बाबा
मिरुग यंदाच्या साली
आता ह्राउ द्या
नंतर घ्या साडीचोळी
तुझ्यावर हाये आता
मदार माझी सारी
हसंल का रं माझं शिवार
येईल का सुख दारी..
सांग भरंल का माझ्या खळ्याची झोळी
तू आला तं दसरा..
तू आला तं दिवाळी..
मांगल्या वर्षी किती पेटल्या रं चिता
अवकळा झाली तुझ्या लेकरांची
तू कुठं व्हता..?
येकदा तोंड दावून
माघारी जाऊ नगं..
साधाभोळा माझा राजा
निष्ठूर होऊ नगं..
लई जाळलं वैशाखानं
आता कर तू माया
अमृताच्या थेंबांमंधी
न्हाऊ दे काया
विहीर,नद्या-नाले
भरून वाहू दे दोन्ही थडा
अंकुराला रुजवून
घाल धरणीला हिरवा चुडा..
असा कसा तू राजा
काळ्या ढगात राहतो
सावळा माझा विठ्ठल
जसा आभाळातून पाहतो..
ये रं ये रं विठूराया
जिवाला तुझी आस..
तुझ्यासाठी आसुसला
काळ्या आईचा बी श्वास..
तुझ्यासाठी आसुसला
काळ्या आईचा बी श्वास..
-अमिता
आंबेरसाच्या येळी
लई बरसंल म्हणे बाबा
मिरुग यंदाच्या साली
आता ह्राउ द्या
नंतर घ्या साडीचोळी
तुझ्यावर हाये आता
मदार माझी सारी
हसंल का रं माझं शिवार
येईल का सुख दारी..
सांग भरंल का माझ्या खळ्याची झोळी
तू आला तं दसरा..
तू आला तं दिवाळी..
मांगल्या वर्षी किती पेटल्या रं चिता
अवकळा झाली तुझ्या लेकरांची
तू कुठं व्हता..?
येकदा तोंड दावून
माघारी जाऊ नगं..
साधाभोळा माझा राजा
निष्ठूर होऊ नगं..
लई जाळलं वैशाखानं
आता कर तू माया
अमृताच्या थेंबांमंधी
न्हाऊ दे काया
विहीर,नद्या-नाले
भरून वाहू दे दोन्ही थडा
अंकुराला रुजवून
घाल धरणीला हिरवा चुडा..
असा कसा तू राजा
काळ्या ढगात राहतो
सावळा माझा विठ्ठल
जसा आभाळातून पाहतो..
ये रं ये रं विठूराया
जिवाला तुझी आस..
तुझ्यासाठी आसुसला
काळ्या आईचा बी श्वास..
तुझ्यासाठी आसुसला
काळ्या आईचा बी श्वास..
-अमिता
Nice ... Simple words arranged with great maturity and scene of current situation and that's how a great poet develops 😊
ReplyDeleteThank you..
Delete